कॉ. भीमराव बनसोड - लेख सूची

मुस्लिम स्थळांच्या वादातून काय साध्य करणार?

देशात सध्या ज्ञानवापी मस्जिदीचे प्रकरण सर्वच प्रसारमाध्यमातून गाजवण्यात येत आहे. ही ज्ञानवापी मस्जिद नसून खरेतर ते शिवालय आहे, असे एका हिंदुत्ववादी गटाचे म्हणणे आहे. याबाबतचे प्रकरण वाराणसीच्या स्थानिक कोर्टात चालू आहे. सदर कोर्टाने या मस्जिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याचे सर्वेक्षण झाले आहे आणि त्याचा अहवालही मा.कोर्टाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी जो …

आरएसएसने देशावर लादलेले अराजक

आरएसएसचे स्वयंसेवक, पण सध्या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री असलेले अनुक्रमे नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन मंत्र्यांच्या पुढाकाराने देशातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. आरएसएसच्या अज्येंड्यानुसार आजपर्यंत त्यांनी काश्मिरातील कलम ३७०, ट्रिपल तलाक, बीफबंदी, नोटबंदी, जी.एस.टी. यांसारखे देशातील मुस्लिमांना व इतर सर्वच जनतेला त्रासदायक होतील असे निर्णय घेतलेले आहेत. ९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर संमत करून …

भाजपाच्या दहशतीने हादरलेली काँग्रेस

सध्या देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे बरेच हाल होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांतून ज्या प्रचंड बहुमताने भाजपाचे सरकार निवडून आले त्याच्या परिणामी व सत्तासाधनांचा सूडबुद्धीने दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याची आर.एस.एस.ची जी पद्धत आहे, तिच्यामुळे काँग्रेससह त्यांच्या समकक्ष असलेले इतर विरोधीपक्षही धास्तावले आहेत. २०१४ च्या निवडणुकांवेळी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताची घोषणा केली होती. त्यावेळी केवळ निवडणुकांतून …

अमेरिका-इराण संघर्ष व भारतीय राष्ट्रवाद

सध्या अमेरिका-इराण संबंधात अत्यंत तणावाचे किंबहुंना युद्धाचे वातावरण तयार झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचे आदेश दिलेही होते. पण ऐनवेळी ते माघारी घेतल्याने तूर्त असे युद्ध टळले आहे. पण पुन्हा युद्ध सुरू होणारच नाही असे नाही. ते कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. कारण ज्याला ट्रम्प यांची ‘बी’ टीम म्हटल्या जाते …

पटेलांच्या आंदोलनातून निर्माण होणारे धोके

गेल्या महिन्यात गुजराथमधील पटेल समाजाने खांद्यावर बंदूक घेउन वावरणाऱ्या 22 वर्षीय हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलच्या नेतृत्त्वाला आव्हान देत सरकारविरोधात आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार धुमश्चक्री केली. आजही भाजपचा पाठीराखा असलेला, जमीनजुमल्यावर बऱ्यापैकी मालकी असलेला, देशांतर्गत व्यापारउदीमावर वर्चस्व असलेला, विदेशातही बळकट आर्थिक स्थान मिळवलेला, राज्य व केंद्र सरकारात मोठा सहभाग असलेला, सामाजिकदृष्ट्याही अस्पृश्य नसल्याने ब्राम्हणाखालोखाल वरचढ …